श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरात संविधान दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

1 min read

बेल्हे दि.२६:- रयत शिक्षण संस्थेचे श्री बेल्हेश्वर विद्यामंदीर व कै. हरिभाऊशेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालयात दि. २६ नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त प्रा. डॉ. शांता गडगे यांचे ‘संविधानिक मूल्ये’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

शाळा समिती सदस्य विश्वनाथ डावखर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बेल्हे गावच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त संरपंच मनिषा डावखर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

या प्रसंगी उपसरपंच राजेंद्र पिंगट, सामाजिक कार्यकर्ते जानकू डावखर, विस्तार अधिकारी किसन खोडदे आदि मान्यवर विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक प्रकट वाचन करण्यात आले.

त्याचबरोबर २६/११ मुंंबईवरील दहशदवादी हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. इयत्ता आठवीतील विद्यार्थीनी वेदांती दुरगुडे हीने संविधान दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेचे समन्वय समिती सदस्य व विद्यालयाचे प्राचार्य अजित अभंग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतानाच संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले.

प्रा. डॉ. शांता गडगे विचार व्यक्त करताना म्हणाल्या, ‘ भारतीय समाजाला संविधानामुळे संधीची व दर्जाची समानता प्राप्त झाली. जबाबदार नागरिक व सुजाण माणूस घडण्याची प्रक्रिया संविधानामुळे शक्य झाली. प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाप्रती कृतज्ञ असणं आवश्यक आहे.’

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतानाच विश्वनाथ डावखर यांनी भारतातील विविधतेतील एकतेचे दर्शन विद्यार्थ्यांना घडविले.सूत्रसंचालन द्रौपदी धराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विकास गोसावी यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे