वळसे पाटील महाविद्यालयामध्ये संविधानाचे पूजन
1 min readनिमगाव सावा दि.२६:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आज रविवार दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे माजी सचिव गणपत घोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाचे पूजन केले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार यांनी भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान असल्याचे तसेच २ वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या अथक परिश्रमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले हे संविधान भारताला मिळालेली एक अनमोल, बहुमोल अशी देणगी असल्याचे सांगितले.
संविधानाच्या पूजनानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. आणि 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करणाऱ्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, माजी सचिव गणपत घोडे गुरुजी, प्रा. अनिल पडवळ, प्रा.शिवाजी साळवे, कमल उनवणे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.