धनगर समाजाच्या वतीने आळे येथे श्री काळ भैरवनाथ महाराजांचा जयंती उत्सव

1 min read

आळे दि.४:- आळे (ता.जुन्नर) येथे मंगळवार दि.५ रोजी (कालाष्टमी) श्री काळ भैरवनाथ महाराजांचा जयंती उत्सव समस्त धनगर समाजाच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे.

धनगर समाज बांधवाच्या वतीने, समस्त आळे संतवाडी व कोळवाडी श्री काळभैरवं नाथ महाराजांच्या दर्शनाचा, महाआरतीचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम असणार असून सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत श्रीचा महा अभिषेक, सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत याग, होम, हवन धार्मिक विधी, संध्याकाळी साडे सहा ते सात दीप माळ प्रज्वलन, संध्याकाळी सात ते साडेसात श्रीची महाआरती तर 7 ते 8 श्री युसुब आतार (आळे)

यांचे शोभेचे दारूकाम होईल. तसेच 8 ते 9.30 या वेळेत महाप्रसाद (भोजन), 9.30 ते 11.30 वाजेपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला भजनी मंडळ (आळे) यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त धनगर समाज, आळे, संतवाडी ग्रामस्थ यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे