श्री क्षेत्र मनोली ते श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी वारी आळेफाटा नगरीत दाखल

1 min read

आळेफाटा दि.२:- श्री गुरुदेव दत्त दयाळूनाथ बाबा यांच्या 38 व्या पुण्यतिथी निमित्त श्री क्षेत्र मनोली (ता.संगमनेर) ते श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळ्याची प्रतिवार्षिक सेवा मनिष बॅग हाऊस आळेफाटाच्या वतीने मोठ्या भक्ती भावाने सेवा संपन्न झाली.

यावेळी दिंडी चालक अध्यक्ष ह भ प बाळासाहेब राधाकृष्ण शिंदे, मोठाभाऊ शिंदे, सरपंच काशिनाथ साबळे, भास्कर शिंदे, सुखदेव शिंदे, नारायण भागवत, अण्णासाहेब साबळे, एकनाथ पऱ्हाड, चंद्रकांत दारोटे, सुनिल दारोटे, साहिल दारोटे,

राजेंद्र शिंदे, शंकर गाडेकर, हितेश गाडेकर, निमसे बाबा, रामचंद्र शिंदे, प्रमिला गडगे आदी महिला भाविक, वारकरी उपस्थित होते. यावेळी दिंडी प्रमुख ह.भ.प बाळासाहेब शिंदे यांच्या वतीने चंद्रकांत दारोटे, मनिष गडगे, राजेंद्र शिंदे, रामचंद्र काठे यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

यावेळी दिंडीसेवक, वारकरी सेवक, आश्रम सेवक व शिष्यवृंद, दिंडी चालक, कीर्तनकार, विणेकरी, गायक, मृदुंगाचार्य, भालदार, भजनी मंडळ, तुळशी वाली, रथ सेवक, सिक्युरिटी आदी वारकरी बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रतिवार्षिकप्रमाणे पायी वारी करण्याऱ्या भाविकांसाठी चहा नाश्ता (अल्पहार) ची उत्तम सोय करण्यात आली. यावेळी गौळण, आरती व निवडक अभंग गाण्यात आले.

दिंडीला दारोटे व गडगे कुटुंब व नातेवाईक आप्तेष्ट यांनी दिंडीची सेवा पूर्तता करून पायी चालत हातात झेंडे पताका, महिला वारकरी यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन टाळ-मृदूंग, वीणा यांचा गजर करीत ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषात निरोप देण्यात आला. पुढील पायी वारी साठी शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे