नळवणे धार्मिकस्थळाबरोबर बनतेय नयनरम्य परिसर; साडेतीनशे वर्षे पुरातन मंदिर 

1 min read

नळवणे दि.२:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील कल्याण-अहमदनगर महामार्गापासून अंदाजे चार- पाच कि.मी.वर नळवणे गावालगतच्या डोंगरावर असणारे तीनशे ते साडेतीनशे वर्षे पुरातन श्री कुलस्वामी खंडेरायाचे मंदिराचा परिसर अतिशय नयनरम्य, आल्हाददायक व निसर्गसौंदयनि नटलेला असून या ठिकाणी अनेक पर्यटक भेटी देत आहेत.

देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नळदुर्ग येथून श्री खंडोबादेव विवाह समारंभानंतर जेजुरी येथे जात असताना नळवणे (ता.जुन्नर) येथील डोंगरावर काही काळ विश्रांती घेतली असता त्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग व नागदेव प्रगट झाले.

त्यानंतर साधारणतः १६४० च्या दरम्यान या स्वयंभू शिवलिंगाजवळ ग्रामस्थांनी खंडोबासह म्हाळसाई व बाणाई यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून मंदिर उभारले, श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट, नळवणे या नावाने नोंदणी झाली आहे.

त्या माध्यमातून मंदिर परिसराचे नियोजन सुयोग्यपणे चालू असून हे देवस्थान एक आकर्षक मॉडेल तयार झाले आहे. उंच डोंगरावर पिण्याच्या पाण्याची बारमाही व्यवस्था, मंदिरासमोरील हिरवळीचा गालिचा, निरनिराळ्या रंगांची फुलझाडे,

आकर्षक आकार दिलेली शोभेची झाडे, बगीचा, लॉन, डोंगरावरून दिसणारा आजूबाजूचा मनमोहक परिसर तसेच जलसंधारणाच्या पाण्यामुळे जिवंत झालेले शिवार पाहून येथे येणारा शिवभक्त मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे