पारनेर तालुक्यात २१२१ विविध पदांसाठी महारोजगार मेळावा
1 min read
पारनेर दि.२९:- पंडित दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यातून तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्याचं काम शासनाच्या वतीने होत असुन पारनेर भाजपा व अंजना सोशल फाउंडेशन संबंधित शासन योजना गरजू नागरिकांपर्यंत पोहचविण्याकामी विशेष सहकार्य करत आहे.
संबंधित रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विश्वनाथ दादा कोरडे मित्र मंडळ, राहुल पाटील शिंदे मित्र मंडळ, जनसेवा फाउंडेशन व पारनेर भाजपा प्रयत्नशील राहणार असुन तालुक्यातील बेरोजगार युवक व युवतींनी ह्या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे.
२१२१ पदांसाठी २९ नामांकित कंपन्यांकडून मुलाखती होणार असून नाव नोंदणीसाठी या अधिकृत लिंकचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. https://forms.gle/dfyTGCN4qw9auXfR6
शुक्रवार दिनांक १ डिसेंबर २०२३ वेळ : सकाळी १०:०० ते सायं. ५:०० पर्यंत स्थळ : लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, पारनेर, जिल्हा अहमदनगर