कै.संतोष सुपे यांच्या कुटुंबीयांना केली पंचावन्न हजारांची रोख मदत

1 min read

मंचर दि. २८:- निघोटवाडी येथील गाडीचालक कै. संतोष होनाजी सुपे यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांची पत्नी व चार मुली या गरिब परिवारावर आलेल्या मानसिक व आर्थिक संकटातुन सावरण्यासाठी मंचर येथील त्रिमूर्ती चालक मालक संघटना व निघोटवाडी ग्रामस्थांचे वतीने दशक्रिया विधीत रोख पंचावन्न हजारांची मदत देण्यात आली.

संकटात सापडलेल्या सुपे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊन या कुटुंबास मदत करुन त्रिमूर्ती चालक मालक संघटना व निघोटवाडी ग्रामस्थांनी आर्थिक मदत करुन सामाजिक जाणीव ठेवून नवीन आदर्श घालून दिला.

केवळ भाषण बाजी पेक्षा कुटुंबचालकाचे जाण्याने मोडुन पडलेल्या संसारास हातभार लावुन गरीब, होतकरु परीवारास जीवनात पुन्हा उमेदीने ऊभे करण्यास मदत करुन उचललेला खारीचा वाटा सगळीकडे कौतुकास पात्र ठरत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे