संकल्प अन्नपूर्णा केंद्र येथे महिलांना दिवाळी निमित्त साडी व फराळ वाटप

1 min read

राजुरी दि. २६:- श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार सेवा केंद्र, राजुरी (दिंडोरी प्रणित) ता. जुन्नर ह्या केंद्रामार्फत महिलांसाठी नियमितपणे विविध उपक्रम राबवित आहे. केंद्राद्वारे अथक प्रयत्नामुळे महिला सक्षमीकरणासाठी फार मोठी मदत झाली आहे.

नुकतेच श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार सेवा केंद्र या केंद्राच्या वतीने संकल्प अन्नपूर्णा केंद्र चे महिला लाभार्थी यांना दिवाळी निमित साडी व फराळ वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमानिमित्त केंद्र प्रतिनिधी सारिका विवेक शेळके (उत्तर पुणे जिल्हा प्रतिनिधी) यांनी संकल्प अन्नपूर्णा केंद्र च्या कार्याचा गौरव करताना संकल्पचे मुख्य प्रवर्तक हाजी गुलामनबी शेख यांचे अभिनंदन केले

व उपस्थित महिलांना संबोधित करताना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास महिलांनी संपर्क साधावा त्यांना सर्व मदत केली जाईल असे सांगितले.

सदर कार्यक्रमास इतर महिला सेवेकरी सारिका रामदास सरोदे, संगीता ज्ञानेश्वर शेळके, अश्विनी वैभव शिंदे, मीनाताई अविनाश पाटील औटी, सुनीता संतोष रायकर तसेच कु.मयूर वैभव शिंदेसं कल्प अन्नपुर्णा चे उपाध्यक्ष जीलानी पटेल,

जब्बार इनामदार, वसीम पटेल, सुफियान मोमीन व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राजुरी व उंचखडक महिला सेवेकरी यांची फार मदत झाली कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी जिलानी पटेल यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे संकल्प च्या वतीने आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे