आळेफाटा पोलिस नागरिकांच्या सहकार्यातून गुन्ह्यांना घालतायत प्रतिबंध
1 min read
आळेफाटा दि.२४:- आळेफाटा पोलिसांनी आळेफाटा एसटी स्टँड वरती पेट्रोलिंग केली तसेच वयोवृद्ध महिला पुरुष यांना आपापल्या जवळील मौल्यवान वस्तू संभाळण्याबाबत बाबत सूचना दिल्या.
तसेच एसटी स्टँड परिसरामध्ये सीसीटीव्ही बसवण्याबाबत नारायणगाव एसटी कंट्रोलरसी संपर्क साधून बसवण्याबाबत सूचना दिल्या. तसेच एसटी स्टँड परिसरामध्ये टॅक्सी रिक्षा वरील ड्रायव्हर यांना एकत्र करून टोपी व सिट्टीचे वाटप करण्यात आले.
त्यांना पोलीस सुरक्षा मित्र संबोधन करून संशयित एसटी स्टँडवर दिसून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधने बाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
अशी माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.