हा आहे ‘आषाढी आणि कार्तिकी एकादशीमधील फरक’

1 min read

पुणे दि.२३:- तुम्हाला आषाढी आणि कार्तिकी एकादशीमधील फरक काय आहे हे माहित आहे का? वर्षभरात २४ एकादशी असतात. यात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या मोठ्या एकादशी मानल्या जातात.

त्यात देखील दोन महाएकादशी मानल्या जातात. यातील पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. अशातच आज २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. तर दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो. कर्क संक्रांत आषाढ मासात येते.

त्यामुळे आषाढ शुद्ध एकादशी अर्थात आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ म्हटले जाते. या दिवशी देव झोपी जातात, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. तर कार्तिक शुद्ध एकादशीला देव झोप घेऊन जागृत होतात. त्यामुळे म्हणून तिला ‘प्रबोधिनी एकादशी’ असे म्हटले जाते.

नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो. त्यामुळे चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात शयन करतो, अशी समजूत आहे. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर लग्न समारंभाला सुरवात होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे