उच्च शिक्षित तरुणाने दूध व्यवसायातून मिळवला लाखोंचा चांगला नफा
1 min read
राजुरी दि.२१:- राजुरी (ता.जुन्नर) येथील सुनील बबन शिंदे यांचे शिक्षण बी.कॉम असुन चांगली नोकरी लागली असताणा देखील केवळ आपल्या आई वडिलांची सेवा व शेती व्यवसाय करण्याचे ठरवले त्यानुसार शेती करत असताना त्याला जोडधंदा म्हणुन दूध व्यवसाय करण्याचे ठरवलेत्.
यानुसार सुरवातीला साधारपणे ६ ते ७ वर्षांपुवी एक गाई आळेफाटा येथील बाजारातुन विकत आणली व एका गाईवर सुरू केलेला व्यवसायावर आज त्यांच्या कडे ३५ गायी असुन या गायांसाठी १० ते १२ गुंठे क्षेत्रात मुक्त गोठा केला
असुन दररोज सकाळी या ठिकाणी सोडले जाते. शिंदे यांणी गायांची अतीशय नियोजनबध्द संगोपन वेळोवळी चारा, पाणी तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहे.
त्यांच्याजवळ असलेल्या ५ एकर क्षेत्रामध्ये जणावरांचे खाद्य पिकवले आहे. यामध्ये घास, हत्तीगवत तर मक्यापासुन मुरघास तयार करून ठेवले आहेत.
तसेच गायींच्या संगोपनासाठी सुग्रास म्हणुन शेंगदाणा पेंड, मका पावडर, गहू भुसा दररोज वापरले जाते तसेच गायींना फिरण्यासाठी मोकळी पण बंदिस्त जागा बनवली आहे.
व उन्हाळयात गायींना थंडावा मिळावा यासाठी फॉगर सिस्टीम बसवली आहे. सध्या दररोज २२५ लिटर दुध डेरीला घालत असुन खर्च वजा जाता दररोज १५०० रूपये प्रमाणे ४५ ते ५० हजार रुपयांचा नफा मिळत आहे. वर्षाला सहा ते सात लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे. तसेच यासाठी भाऊ संतोष, पत्नी वैशाली यांची मोलाची साथ मिळत आहे.
शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता मी शेती व्यवसाय चालु केला परंतु शेतमालाला ही योग्य असा बाजारभाव मिळत नसल्याने अडचणी वाढु लागल्या त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणुन दुध व्यवसाय चालु करण्याचे ठरवले व सुरवातीला एक गायी आणली तेव्हापासुन आजपर्यंत ३५ गाया आहेत.चालु वर्षी पाऊस अतिशय कमी प्रमाणात झालेला असल्याने चारा टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. तसेच दुधाचे बाजारभाव उतरले असुन सुग्रास चे बाजारभाव वाढतच चालले आहे.
सुनिल शिंदे, दूध उत्पादक शेतकरी, राजुरी