जुन्नर तालुक्यातील बेरोजगार व गरजू युवक युवतींसाठी रोजगाराची सुवर्ण संधी

1 min read

नारायणगाव दि.१८:- जुन्नर तालुक्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी, नारायणगाव पोलीस स्टेशन व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, अहमदनगर यांचे वतीने खालील नमुद सर्व कोर्सेसचे ऍडमिशन चालू आहे.

जर आपल्या गावामध्ये कोणी बेरोजगार युवक युवती असेल. 100% नोकरीची संधी मिळेल तुमच्या एका छोट्याशा मदतीने काही मुलांना करिअर करण्याची संधी मिळेल व नोकरी नंतर व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. असा संदेश नारायणगाव पोलीस स्थानकाच्या वतीने देण्यात आला आहे.

या मद्ये 1) टू व्हीलर मेकॅनिकल, 2) फोर व्हीलर मेकॅनिकल, 3) नर्सिंग ( GDA ), 4) हॉटेल मॅनेजमेंट हॉस्पिटॅलिटी हाउस किपिंग कोर्स 5) प्लंबिंग 6) वेल्डिंग असे विविध क्षेत्र असतील.

प्रशिक्षण ठिकाण :- अहमदनगर, प्रशिक्षण कालावधी :- 45 दिवस, मानधन :- 8000/- ते 18,000/- रुपये अधिक माहितीसाठी संपर्क दत्ता ढेंबरे 7350345207, शैलेश वाघमारे- 7020908258 किंवा गावचे पोलीस पाटील यांचेशी संपर्क करावा.

तरी बेरोजगार व गरजु उमेदवारांनी 1) आधारकार्ड, 2)शाळा सोडल्याचा दाखला 3) गुणपत्रिका, 4) पासपोर्ट साईज फोटो, 5) बँकेचे पासबुक, 6) जातीचा दाखला इत्यादी मुळ कागदपत्रे घेऊन दि. 30/11/2023 रोजी पर्यंत नारायणगाव पोलीस स्टेशनशी संपर्क करावा.

राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे. तसेच 100% प्लेसमेंट आहे. त्यामुळे या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन नारायणगाव चे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे