कीर्तनाचे मानधन १ लाख रुपये श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट साठी सुपूर्द:- हभप पंकज महाराज गावडे

1 min read

दौंड दि.१५:- आमदार रमेश आप्पा थोरात यांचे राजकीय गुरू, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शिंदे यांचे व काळूराम शिंदे यांचे वडील मिरवडी गावचे शिल्पकार वै. मारुती (आप्पा) सखाराम शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हभप पंकज महाराज गावडे यांनी काल दि.१४ रोजी कीर्तन सेवा केली. या प्रसंगी आप्पांचे दुसरे शिष्य शिवनेरी उद्योग समूहाचे पर्यावरणप्रेमी १२ हजार वृक्ष झाडे लावणारे, पक्ष्यांचा ज्यूसबार म्हणून केवळ पक्षांसाठी ३५० फळ झाडे लावणारे मिरवडी चे मा. सरपंच सागर शेलार यांचा आणि प्रकाश खराबी, पर्यावरण प्रतिष्ठानचे राजन जी जांभळे या सर्वांच्या आग्रहाने कीर्तन सेवा केल्यावर पंकज महाराज गावडे यांनी आवाहनानुसार परिवाराच्या वतीने श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या मंदिरासाठी कीर्तन मानधन देणगी म्हणून. १ लाख रुपयांचा धनादेश मा. आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते माझ्याकडे सुपूर्द करण्यात आला. आप्पा हे प्रचंड त्यागी पुरुष होते. शिक्षण, शेती, न्यायनिवाडा, धार्मिक कार्य, पाणी पुरवठा योजना, पुण्यशोलक आहील्यादेवी माध्यमिक विद्यालय स्थापना अशी अनेक कामे त्यांनी आपल्या जीवनात केली आणि अजरामर झाले. काल गावकऱ्यांच्या डोळ्यात तरळलेले अश्रू आणि दौंड तालुक्यातील उपस्थित असलेले असंख्य मान्यवर आप्पांच्या कार्याला मिळालेली पोहच पावती होती. काल कीर्तन केल्यावर एक अनोखे समाधान मला प्राप्त झाले. परिवाराने श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट साठी दिलेले मानधन देणगी साठी गावडे महाराज यांनी प्रती सद्भावना व्यक्त केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे