पिंपळवंडीत शिवजन्मभूमी सेवा फौंडेशनच्या वतीने ऊसतोड कामगारांची दिवाळी गोड

1 min read

पिंपळवंडी दि.१४:- ग्रामस्थ पिंपळवंडी (ता.जुन्नर) यांचे सहकार्याने शिवजन्मभूमी सेवा फौंडेशनच्या वतीने पिंपळवंडी परिसरातील ऊस तोड मजुरांची दिवाळी गोड केली.

शिवजन्मभूमी सेवा फौंडेशनचे सदस्य अक्षय वाघ, विशाल अभंग, प्रशांत फल्ले, सचिन वामन, सागर वामन, प्रज्योत फुलसुंदर, अनुज खोंड, नयन फुलसुंदर, चंद्रकांत काकडे, सद्दाम इनामदार, किशोर कोकाटे, नितीन निमसे व इतरांनी पिंपळवंडी परिसरातील ऊस तोडणी मजुर महिलांना मिठाई व साडी चोळी देऊन भाऊबीज व दिवाळी साजरी केली व ऊस तोडणी मजुरांची दिवाळी गोड केली.

शिवजन्मभूमी सेवा फौंडेशनच्या सर्व सदस्यांचे श्री विघ्नहर परिवारातर्फे आभार मानण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे