समर्थ शैक्षणिक संकुल तर्फे संकल्प अन्नपूर्णा येथे वयोवृध्द निराधारांना फराळ वाटप

1 min read

राजुरी दि.१४:- संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था संचलित संकल्प अन्नपूर्णा केंद्र, राजुरी (ता.जुन्नर) येथे सालाबाद प्रमाणे वयोवृध्द व निराधार यांना समर्थ शैक्षणिक संकुल, बेल्हे तर्फे दिवाळी निमित्त फराळ वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमात संकल्प अन्नपूर्णा केंद्राचे कार्याध्यक्ष तथा मुख्य प्रवर्तक हाजी गुलामनबी शेख यांनी प्रास्ताविक करताना सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

या वेळी माहिती देताना त्यांनी सांगितले की संकल्प अन्नपूर्णा केंद्र हे ७ व्या वर्षात पदार्पण करीत असून गेल्या सहा वर्षांत सुमारे १ लाख २५ हजार पेक्षा जास्त डब्यांचे वयोवृध्द निराधार यांना मोफत वाटप करण्यात आले आहे.

सलग २२०० दिवस अविरत अन्नदान सुरू असून हे केवळ सर्व दानशूर अन्नदाते व समस्त ग्रामस्थ राजुरी आणि राजुरी गावातील सामाजिक आर्थिक संस्था या सर्वांच्या बहुमोल सहकार्य मुळे शक्य झाले आहे.

समर्थ शैक्षणिक संकुल चे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी या उपक्रमाचे कौतुक करून पुणे जिल्ह्यातील हे एक अभिनव उपक्रम असल्याचे सांगून राजुरी गावासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले व संस्थेस शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संकल्प अन्नपूर्णा केंद्रचे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या सहाव्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

सदर कार्यक्रमात राजुरी गावचे उपसरपंच माऊली शेळके, ग्रामपंचायत सदस्य शाकीर भाई चौगुले, तंटा मुक्तीचे अध्यक्ष दिलीप घंगाळे, माजी सरपंच संजय गवळी, समर्थ शैक्षणिक संकुल चे सचिव भाऊ शेळके , विश्वस्त वल्लभ शेळके, बंटी हाडवळे , संदीप औटी, बाळासाहेब हाडवळे, गणेश हाडवळे, मुख्य प्रवर्तक हाजी गुलामनबी शेख, उपाध्यक्ष जिलानी पटेल, वसीम पटेल, सुफियान मोमीन व इतर मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे समारोप करताना उपाध्यक्ष जिलानी पटेल यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे