गौरी नामे गाईला मिळाले माता पिता; शेतकरी कुटुंबाने साजरा केला गाईचा वाढदिवस

1 min read

पिंपरी पेंढार दि.१४:- शेतकऱ्यांचे आपल्या गोठ्यातील पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम असते, तसे प्राण्यांचेही प्रेम विशिष्ट माणसासोबत जडते याचा प्रत्येय आपल्याला नेहमी येतच असतो.

खामुंडी (ता.जुन्नर) येथील एका शेतकऱ्याच्या आपल्या घरगुती गावठी गायीला तीन वर्षांपूर्वी एक कालवड झाली त्या कालवडीला आपली मुलगी मानून तिचे गौरी असे नामकरण करण्यात आले,

गौरीच्या बाललीला पाहून अवघे शेतकरी कुटुंब भारावून गेले नारायण कोकाटे व मनीषा कोकाटे असे या शेतकरी पती पत्नीचे नाव आहे.त्यांचा मुलगा अभिषेक कोकाटे याला बहीण नसल्याने त्यांनी गौरीलाच आपली बहीण मानून तिचा तिसरा वाढदिवस खामुंडी गावचे ग्रामपंचायत सदस्य सागर कोकाटे यांच्या हस्ते केक कापून व उपस्थितांना अल्पोपहार देऊन मोठ्या उत्साहात साजरा केला.

या प्रसंगी हिरीचंद्र कोकाटे, योगेश शेलार, राजेंद्र कोकाटे, अनिकेत कोकाटे, गणेश सरजिने, अभय दुरगुडे व ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे