बेनके कुटुंबियांच्या वतीने अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशावर्कर्स महिलांना दिवाळी भेट वाटप
1 min readनारायणगाव दि.१३:- जुन्नर तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशावर्कर्स महिलांना दिवाळी भेट वाटप कार्यक्रम गौरी अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशावर्कर्स माता भगिनींनी कोरोना काळात धीरोदात्तपणे केलेले कार्य आजही आठवणीत आहे. शासनाला शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रातही महत्वाचे आणि मोलाचे सहकार्य या सर्व महिला घटकांचे असते.
माझ्या वतीने व आमच्या समस्त बेनके परिवाराच्या वतीने या माता भगिनींना दरवर्षी दिवाळी भेट देण्यात येते. यंदाही हि परंपरा कायम ठेवत दिवाळी भेट वाटप कार्यक्रम पार पडला.अशी माहिती गौरी बेनके यांनी या वेळी दिली.
या वेळी विविध मान्यवर तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशावर्कर्स माता भगिनींनी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
बेनके कुटुंबियांच्या वतीने जुन्नर तालुक्यातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.