भरत आस्वार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड
1 min read
बेल्हे दि.१६:- जनसेवा सेवाभावी संस्था प्रणित अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी भरत आस्वार यांची निवड केल्याचे पत्र संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष बाळासाहेब आढाव व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्या हस्ते बेल्हे (ता.जुन्नर) येथे बैठकीत देण्यात आले.
यावेळी बेल्हे येथील बैठकीत मुजाहिद फकीर मोहम्मद बेपारी यांची जुन्नर तालुका अध्यक्षपदी तर फकीर मोहम्मद हमीद बेपारी यांची पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी तर शाही नाज अमजद इनामदार यांची पुणे जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष आढाव यांनी संस्थेचे कार्य व संस्थेचे महत्त्व पटवून दिले. तर उपाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी आपल्या संघटनेने आत्तापर्यंत अनेक लोकांवर झालेले अन्याय अत्याचार दूर करून केलेल्या भ्रष्टाचार उघड करून न्याय देण्याचे काम संघटना करीत असून कार्यकर्त्याच्या पाठीशी उभी असते असे आपल्या मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास पारनेर तालुका युवा अध्यक्ष किसन शिंदे, कार्याध्यक्ष नितीन परंडवाल सामाजिक कार्यकर्ते बबन जाधव, अनिल पुंडे, बापू मस्कुले, रुकसाना पठाण, जमीन शेख, मुन्ना शेख, नूर जहा पठाण,पाटील खरात, सुनील शिरसाट आधी उपस्थित होते.
यावेळी बेल्हे ग्रामपंचायत सदस्य नाझीम बेपारी यांनी सत्कार केला तर समाजाचे सदर वसीम बेपारी यांनी आभार मानले.