राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सपत्नीक घेतले श्री विघ्नहर गणपतीचे दर्शन
1 min read
ओझर दि.१५:- राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतेच श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत तालुक्याचे आमदार अतुल बेनके उपस्थित होते.
यांनी श्री विघ्नहर गणपतीचे मनोभावें दर्शन घेतले आणि श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्ट चे पदाधिकारी, विश्वस्त मंडळाशी संवाद साधला आणि देवस्थानच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांना आणि भाविकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे, तानाजी बेनके, किरण वळसे पाटील, बाळासाहेब बेंडे, गुलाब नेहेरकर यांसह देवस्थानचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.