औद्योगिक कंपन्यांच्या केमिकलयुक्त पाण्याने इंद्रायणी फेसाळली
1 min read
आळंदी दि.१२:- औद्योगिक कंपन्यांमधून केमिकलयुक्त पाणी विना शुद्धिकरण करता थेट इंद्रायणी नदी सोडले जात असल्याने नदी वारंवार फेसाळत असून पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आळंदीसह परिसरात शुक्रवारी (दि. १०) रात्री अचानक अवकाळी पावसाने सुरुवात केली त्या अवकाळीच्या पाण्यात पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतून म्हणजेच तळवडे, चिखली, मोशी या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या प्रमाणातील औद्योगिक परिसरातून केमिकलयुक्त पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडल्याने तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा इंद्रायणी फेसाळली आहे.
संपूर्ण नदीवर पांढरे शुभ्र फेस निर्माण झाले असून जणू काही तिने पांढरा शालूच पांघरले आहे की काय असे दिसत आहे. हे दृश्य पाहून भाविकही आश्चर्यचकित झाले आहे.
पाण्यात हात लावावा की नाही हे देखील कळत नसून या पाण्यामुळे अनेकांना विविध व्याधीही जडल्या आहेत. तरी हे केमिकल युक्त पाणी थेट नदीत सोडणे औद्योगिक नगरितील कारखानदारांनी बंद करावे, अशो मागणी केली जात आहे.
तसेच अशा कारखानदारांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळीच कारवाई करावी, अशी ही मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.