जुन्नरमधील सहा मंडलातील ८८ गावांत दुष्काळसदृश परिस्थिती:- आमदार अतुल बेनके
1 min read
जुन्नर दि.१२:- जुन्नर तालुक्यातील बेल्हे, वडगाव आनंद, जुन्नर, ओतूर, नारायणगाव, निमगाव सावा या सहा मंडल कार्यक्षेत्रातील ८८ गावांत दुष्काळासदृश परिस्थिती शासनाने जाहीर केला आहे.
यामुळे या गावातील शेतकरी, विद्यार्थी यांना शासनाच्या सवलतीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील महसुली मंडलात जून ते सप्टेंबर २०२३ कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असून तिथे दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली होती.
त्यांच्या मागणीला यश आले तालुक्यात असून कमी पर्जन्यमान झालेल्या महसुलीमंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यात येणार आहे.
हा प्रस्ताव आमदार अतुल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठविला होता.
ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिलिमीटर पेक्षा कमी झाले आहे अशा २१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे.