जुन्नर तालुक्यात दोन कोटींच्या विकासकामांना मंजुरी – आमदार अतुल बेनके
1 min readजुन्नर दि.१०:- जुन्नर तालुक्यातील २०२३ – २४ आर्थिक वर्षासाठी लेखाशिर्ष ३०५४- २४१९ रस्ते व पूल परिक्षण कार्यक्रम अंतर्गत गट ‘ब’ व गट ‘क’ मधील दोन कोटी रुपयांच्या (अंदाजपत्रकिय किंमत) विकासकामांना प्रशासकीय मंजूरी मिळाली असल्याची माहिती तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिली.
यामधे पिंपळगाव तर्फे नारायणगाव ते रामोशीवाडी (३० लाख), ज्ञानेश्वररवस्ती रेडा समाधी रस्ता (३० लाख), जुना बोटा नगारी ठाकरवाडी (वडगाव आनंद मार्ग ३० लाख), माळवाडी (नेतवड) ते प्रजीमा २ ला जोडणारा मार्ग (३० लाख),
येडगाव जोरेमळा ते रा. मा. ५० ला मिळणारा मार्ग (३० लाख), ओतूर ते धावशी (३० लाख), गुंजाळवाडी (वायकर मळा) ते प्रा. मा. १९२ ला जोडणारा मार्ग (२० लाख) या रस्त्यांचा समावेश आहे.