श्री साईगणेश पतसंस्थेच्या चेअरमन पदी निलेश लामखडे तर व्हाईस चेअरमन खंडु खुटाळ यांची निवड
1 min read
बेल्हे दि.५:- श्री साईगणेश कृपा पतसंस्था मंगरुळ (ता.जुन्नर) संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक सन 2023-24 ते 2027-28 निवडणुक बिनविरोध पार पाडली. रविवार दि.५ रोजी चेअरमन व्हाईस चेअरमन ची निवड झाली.
संस्थेच्या चेअरमन पदी पुन्हा निलेश लामखडे तर व्हाईस चेअरमन खंडु खुटाळ यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणुक अधिकारी डी. डी. डोके व व्यवस्थापक कैलास / विलास लामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
उपस्थित संचालक तुकाराम लामखडे, बाळासाहेब लामखडे, बाबाजी कोरडे, विक्रम लामखडे, गोपीनाथ लामखडे, सुनील वाजे, चंद्रशेखर भोजणे, अण्णासाहेब लबडे, सुनिता खराडे, शितल गाडगे, सुप्रीया मनसुख आदी उपस्थित होते. तसेच तज्ञ संचालक पदी दतात्रय बापु लामखडे व ज्ञानदेव येवले यांची नियुक्ती करण्यात आली.