मातोश्री आयुर्वेद कॉलेजच्या विद्यार्थांनी घरोघरी जाऊन आयुर्वेद चे महत्व पटवले
1 min readकर्जुले हार्या दि.७:- येथील मातोश्री आयुर्वेद कॉलेजच्या विद्यार्थांनी घरोघरी जाऊन नागरिकांना आयुर्वेद चे महत्व पटवले. ‘आयुर्वेद डे’ कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबविले. या मध्ये शाळातील विद्यार्थांची रक्तगट तपासणी, राजीव गांधी कॉलेज मध्ये स्टाफ ची व शिबिर मातोश्री सायन्स कॉलेज शुगर तपासणी, तसेच मातोश्री ग्लोबल स्कूल शुगर तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी, अंगणवाडी सेविका यांची कार्यशाळा घेतली. त्याच बरोबर आयुर्वेद रोपे वाटप, दिवाळी निमित्त स्टाफसाठी सुगंधित तेल व उटने तयार करणे असे विविध उप्रक्रम राबविले. यात संस्थेचे सचिव किरण आहेर, कार्याध्यक्ष डॉ दीपक आहेर, संचालिका डॉ श्वेताबरी आहेर, संचालिका शितल आहेर, प्राचार्या धनश्री होळकर, डॉ. रेश्मी काळूखे, डॉ. केवल धर्याशिल, डॉ.मोनिका मदने, डॉ दिशा माने, डॉ कटारिया मॅडम, डॉ शिनगारे मॅडम, जाधव मॅडम, डॉ माधव बोरुडे, डॉ. काळोखे डॉ. घाणे, डॉ. सुप्रिया, डॉ.घाडगे, डॉ.विनोद , डॉ. स्वाती पठारे, डॉ दीपाली सर्व आयुर्वेद विद्यार्थी यांनी मोलाची भूमिका निभावली अशी माहिती संस्थेचे रजीस्टार यशवंत फापाळे यांनी दिली.