सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्केटिंग कॉम्पिटिशन मध्ये घवघवीत यश
1 min read
राजुरी दि. ७:- गोवा येथे आयोजित राष्ट्रीय स्केटिंग कॉम्पिटिशन मध्ये सातवीचा विद्यार्थी मोक्ष सुतार याने बारा वर्षाखालील वयोगटात प्रथम क्रमांक पटकवला तसेच व ग्रंथ छेडा याने 14 वर्षाखालील वयोगटात प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पटकावले. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक नितीन एसार यांनी मार्गदर्शन केले.सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे चेअरमन व्ही. आर .दिवाकरन, पटेल सर ,डॉ. भानुशाली सर, नितीन लोणारी, ॲड. शंकर महाराज शेवाळे, सचिन चव्हाण सर, बलराम सर , प्राचार्य रिजवाना शेख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.