डॉ. कदम गुरुकुल मध्ये रंगारंग वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
1 min readइंदापूर दि.७:- डॉ. कदम गुरुकुल मध्ये दि. 1 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत नर्सरी ते इयत्ता दहावी पर्यंत स्नेहसंमेलन संपन्न झाले. यामध्ये नर्सरी ते,दुसरी पर्यावरण आणि आनंद, तर तिसरी ते दहावी एकता या विषयांवरती विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या. पहिला दिवस हा फ्लेमिंगो पॅराडाईज म्हणजेच बाल चिमुकले यांनी नेत्रदीपक अशी कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दुसरा दिवस इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या अदाकारी सादर केल्या. तिसरा दिवस इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा होता. त्यांनीही त्यांच्या नृत्य कलाविष्कारणे पालकांकडून कौतुकाची दाद मिळवली. आणि शेवटचा चौथा दिवस इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा होता त्यांनीही वृक्ष संवर्धन,जी 20, झाशीची राणी शिवराज्यभिषेक सोहळा अशा प्रकारच्या नाटिका सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. खूप सुंदर सादरीकरण केले या रंगारंग कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील उपस्थित होते. त्यांनी उपस्थित पालकांना आपल्या भाषणातून हे सांगितले की, मुलांना त्यांच्या कलेने शिकू द्या, त्यांच्यावर अभ्यासाचे ओझे लादू नका, मनसोक्त खेळू द्या असे सांगून. पालकांनाही आरोग्य चांगले, निरोगी राहण्यासाठी रोज व्यायाम केला पाहिजे असे सांगितले. आणि डॉ. कदम गुरुकुल विद्यालयाचे खूप कौतुक केले. मुलांना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अतिशय सुंदर नवीन तयार झालेले LSK सभागृह उपलब्ध करून दिले. त्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक डॉ. एल एस कदम, शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम, डॉ. विवेक कदम,डॉ. नुपूर कदम, अविनाश ननावरे, संदीप पांढरे, सचिव नंदकुमार यादव,प्राचार्य वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्य ऋषी बासू,अनिता पराडकर, स्कूल मॅनेजर संदीप जगताप उपस्थित होते. त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले. तर पांडुरंग घाडगे, रवींद्र नागटिळक, ऋषी बासू श्रीराम कवितके यांनी उपस्थितांचे आभार मानले.