सह्याद्री व्हॅली इंजीनियरिंग कॉलेजचा अमृत कलश दिल्ली येथील ‘मेरी माटी, मेरा देश’ कार्यक्रमात सुपूर्द
1 min readराजुरी दि.२:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वकांक्षी मानलेला आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सूचनेनुसार निवडलेले कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवक या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. शुरविरांची, संत महांतची व क्रांतिकारकांची, प्राचीन, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या. शिव जन्मभूमीतील सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालय राजुरीचा अमृत कलश जुन्नर तालुक्यातील माती घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. उद्धव भारती आणि स्वयंसेवक प्रेम पडळकर आणि आरती उदार यांच्या हस्ते दिल्ली येथे होणाऱ्या अमृत कलश संकलन मेरी माटी मेरा देश उपक्रमा अंतर्गत संचालनालय महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष रेल्वे दिल्लीला रवाना करण्यात आली. हा अमृत कलश सल्लागार राजेश पांडे यांच्याकडे कर्तव्य पथावर सुपूर्द करण्यात आला. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी महाविद्यालयाचे संचालक सचिन चव्हान सर,सर्व विश्वस्तांनी प्रोत्साहन दिले सपोर्ट केला. महाविद्यालयाचे,
प्राचार्य संजय झोपे, उपप्राचार्य पी. बालारामुडू यांच्या मार्गदर्शनानुसार जुन्नर तालुक्याची माती घेऊन दिल्लीला रवाना करण्यात आला होता. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनचे स्वयंसेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.