समर्थ शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय एकता दिवस संपन्न
1 min readबेल्हे दि.१:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल,बेल्हे येथे राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शपथ घेण्यात आली.युवा व क्रीडा खेल मंत्रालय,भारत सरकार यांनी उदघोषित केल्यानुसार दि.३१ ऑक्टोबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिना निमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात आला.राष्ट्रीय एकात्मतेत भारतीय ऐक्य,सुरक्षा व संरक्षण या क्षेत्रामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाची सुरुवात टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन आणि सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
एकता दिवस हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृती प्रित्यर्थ सगळीकडे साजरा केला जातो.सरदार वल्लभभाई पटेल यांचे चरित्र तरुणांसाठी दिशादर्शक असून विद्यार्थ्यांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले यांनी केले.यावेळी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवनपटाविषयी माहिती दिली.समर्थ शैक्षणिक संकुलात उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने शपथ देण्यात आली.तसेच या दिवशी महाविद्यालयामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जिवनपटावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होेते.त्यामध्ये निबंध स्पर्धा, ऑनलाईन चित्रफीत,माहितीपट इ.उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी देखील एकता दिनाच्या निमित्ताने घोषवाक्ये तयार केली.राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जवळपासच्या माजी सैनिकांची माहिती संग्रहित ठेवणार असल्याची माहिती रा से यो समन्वयक प्रा.भूषण दिघे यांनी दिली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके. विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले, अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर,संकुलातील सर्व प्राचार्य, विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भूषण दिघे यांनी तर आभार प्रा.अश्विनी खटिंग यांनी मानले.