पुणे युनिट चे कमाडिंग अधिकारी कर्नल विपिंनकुमार मल सेना मेडल यांची बाळासाहेब जाधव महाविद्यालयाला भेट

1 min read

आळे दि.१:- ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित मा. बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आळे (ता.जुन्नर) २ महाराष्ट्र गर्ल्स एनसीसी, पुणे युनिट चे कमाडिंग अधिकारी कर्नल विपिंनकुमार मल सेना मेडल यांची महाविद्यालयाच्या २ गर्ल्स एनसी सी युनिट ला निरीक्षण – परीक्षण करणे कामी भेट देण्यात आली. त्यांच्या समवेत सुबेदार मेजर गील, नायब सुबेदार श्रीपती शिंदे, बी एच एम गीरी असे लष्करी पथक होते या सर्वांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रवीण जाधव  केले आणि महाविद्यालयाची माहिती दिली.
या मधे महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट स करीत असलेले विविध उपक्रम, एनसीसी च्या माध्यमातून लष्करात, पोलिस सेवेत, शिक्षण क्षेत्रात भरती झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती, आणि एनसीसी कॅडेटस चे संचलन दाखविण्यात आले. कर्नल विपिंनकुमार मल सेना मेडल यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे यांनी केले. या प्रसंगी त्यांनी संस्था आणि एनसीसी यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. महाविद्यालयांनी  विकास समिती अध्यक्ष  प्रदिप गुंजाळ यांनी एनसीसी आजच्या तरुणासाठी किती महत्वाची आहे, हे विषद केले. जीवन शिंदे यांनी माध्यमिक साठी देखील ज्युनिअर विंग एनसी सी मान्य करावी अशी मागणी केली. मेजर डॉ. सुषमा कदम यांनी लष्करी अधिकाऱ्यांचा परिचय करून दिला. आणि त्यांनी देशसेवेाठी केलेल्या योगदानाची माहिती दिली. त्याच बरोबर आपल्या छात्र साठी २ गर्ल्स युनिट चे मिळत असलेले सहकार्य सांगितले.एनसीसी राबवित असले ल्या उपक्रमा ची माहिती प्रोजेक्टर वापरून कॅडेट प्रिया आहेर हिने उत्कृषटरित्या सादर केली. तिचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले.
सी एस एम वैष्णवी कुरकुटे हिच्या नेतृत्वाखाली २ गर्ल्स कॅडेटस नी उत्कृष्ट संचलन करून कप्तान अधिकारी आणि पथका ला मानवंदना दिली.कर्नल विपिंनकुमार मल सेना मेडल यांनी कडेट्स सोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि छात्र नी विविध कॅम्प मधे आपला सहभाग घेऊन महाविद्यालयाचे नाव उंचावेत असे प्रेरक आव्हान केले.२ गर्ल्स एनसीसी विभागाचे आणि महाविद्यालय   एनसीसी मार्फत राबवित असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके मानद सचिव अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे तसेच संचालक किशोर कु-हाडे,भाउ कु-हाडे बबन  सहाणे, उल्हास सहाणे, बाबु कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ , जीवन शिंदे, दिनेश सहाणे, कैलास शेळके, प्रदिप गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे   व सर्व संचालक मंडळ यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमा चे प्रा. संजय वाकचौरे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे