समर्थ अभियांत्रिकी च्या “होम ऑटोमेशन सिस्टीम” या इनोव्हेटिव्ह संकल्पनेला तृतीय क्रमांक
1 min readबेल्हे दि.३१:- “इम्पॅक्ट २०२३” अंतर्गत घेण्यात आलेल्या “इनोव्हेटिव्ह आयडियाज” या टेक्निकल कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय,ताथवडे,पुणे येथे करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अंतर्गत असलेल्या विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून “इनोव्हेटिव्ह आयडियाज” या संकल्पनेला अनुसरून अनेक प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.त्यामध्ये समर्थ अभियांत्रिकीच्या महाविद्यालय बेल्हे येथील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील सिद्धेश गाडगे,स्वानंदी मोरे आणि पुनिष्का पाटील यांनी सादर केलेल्या “सिंपली स्मार्ट:अँड्रॉइड ड्रीव्हन होम ऑटोमेशन सिस्टीम युजिंग आय ओ टी” या प्रकल्पास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी यांनी दिली.
या विद्यार्थ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाईल मधील अँड्रॉइड एप्लीकेशन च्या साहाय्याने घरातील सर्व उपकरणे अँड्रॉइड मोबाईल शी कनेक्ट केली.हि उपकरणे चालू अथवा बंद करणे तसेच स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा गॅस सिलेंडर जर लिकेज झाला असेल तर अलर्ट मेसेजद्वारे अँड्रॉइड टेक्नॉलॉजी च्या मदतीने आपल्याला कळू शकते व त्यानुसार आपण काळजी घेऊ शकतो.
आपल्या घरामध्ये जर एखादी अनोळखी व्यक्ती आपल्या अनुपस्थितीत येण्याचा प्रयत्न करत असतील, चोरांपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या सिस्टीमचा वापर केला जाऊ शकतो असे सिद्धेश गाडगे,स्वानंदी मोरे व पुनिष्का पाटील यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर इंजीनियरिंग विभागप्रमुख प्रा.स्नेहा शेगर,प्रा.निवृत्ती चौधरी यांनी मार्गदर्शन केले.सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर व संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.