“सुरुवात करा योगासनाची यानेच आपल्या आयुष्यात उधळण होईल आनंदाची”-डॉ. अंजली पारगावकर

1 min read

निमगाव सावा दि.३१:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित व श्री. पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा, (ता. जुन्नर) या ठिकाणी विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत दि.३० रोजी, “निर्भय कन्या अभियान” राबविण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अंजली पारगावकर, डॉ. रसुल जमादार तसेच प्रा. प्रल्हाद शिंदे व ज्युडो कराटे प्रशिक्षक ओंकार कुलकर्णी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राहुल सरोदे यांनी केले. त्यांनी निर्भय कन्या म्हणजे काय? महिला, मुली यांच्यासोबत समाजात होणारे नकारात्मक प्रसंग कसे रोखता येतील याविषयी सांगितले. डॉ. अंजली पारगावकर यांनी मुलींनी आत्मनिर्भर कसे बनावे, त्याचप्रमाणे “योगा, आहार आणि विहार” याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. रसुल जमादार यांनी विद्यार्थिनींना शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्तरावर कशाप्रकारे सक्षम झाले पाहिजे तसेच पारंपारिक शिक्षण घेऊन नोकरीचा शोध घेण्यापेक्षा ज्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत, त्याचा फायदा घेऊन भविष्य घडवा, असे मार्गदर्शन केले. प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी “महिला सबलीकरण-: स्त्री काल आज आणि उद्या” याविषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रामध्ये श्री. ओंकार कुलकर्णी ज्युडो कराटे प्रशिक्षक यांनी आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला आधारून मुलींवर जी संकटे येतात त्याला प्राथमिक स्तरावर कसे रोखता येईल तसेच लॉकिंग पद्धत प्रत्यक्ष सादर करून विद्यार्थिनींच्या मनातून भीती घालवली.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संस्था अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, संस्था प्रतिनिधी कविता पवार, प्राचार्य डॉ.छाया जाधव आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निलम गायकवाड आणि आभार प्रा. प्रियांका डुकरे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे