मंचर ला रंगला भव्य गणेशोत्सव नवरात्रोत्सव करंडक व आंबेगाव समाज भूषण पुरस्कार सोहळा

1 min read

मंचर दि.४:- मंचर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख प्रा.सुरेखा निघोट आयोजित महागणपती नवरात्रोत्सव करंडक घरगुती गणपती स्पर्धा बक्षीस वितरण व मिसेस आंबेगाव सौभाग्यवती सौंदर्यवती स्पर्धच्या विजेत्यांना करंडक, ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यात महागणपती करंडक बाल विजय गणेश मंडळ, मोरडेवाडी, आंबेगाव चा राजा हनुमान मित्र मंडळ निघोटवाडी, आंबेगाव चा सम्राट -मार्केट यार्ड मित्र मंडळ मंचर तर आंबेगाव चा महाराज किताब राजा शिवछत्रपती तरुण मंडळ पिंपळगाव यांना देण्यात आला. तर विघ्नहर्ता प्रतिष्ठान म्हाळुंगे पडवळ, बब्रुवाहन मित्र मंडळ शेवाळवाडी, हनुमान मंडळ मंचर हे गणेशोत्सव करंडकाचे मानकरी ठरले. तसेच शितळामाता नवरात्रोत्सव मंचर, वजीर प्रतिष्ठान मंचर, राजाशिवछत्रपती मंडळ मंचर, अंबिका माता मंडळ पहाडदरा, राष्ट्रप्रेमी मंडळ लोणी, भैरवनाथ जोगेश्वरी नवरात्रोत्सव मंचर, वैष्णोदेवी नवरात्रोत्सव पेठ, त्रिमूर्ती नवरात्र गणेश मंडळ एस काॅर्नर, श्रीकृष्ण ग्रामविकास प्रतिष्ठान निघोटवाडी, शिवनेरी ग्रुप लांडेवाडी, श्रीराम मित्र मंडळ निघोटवाडी हे नवरात्रोत्सव करंडकाचे मानकरी ठरले आहेत.याचवेळी घरगुती गणपती च्या पंचवीस स्पर्धकांनांनाही सन्मानित करण्यात आले.यावेळी भारतीय विद्यार्थी सेना आंबेगाव तालुका प्रमुख प्रा.अनिल निघोट यांचे वतीने पंचवीस जणांना आंबेगावभुषण तर एकशे एक जणांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.यावेळी प्रा.अनिल निघोट मित्र मंडळाचे बाबाजी कराळे, आशिष पुंगलिया, किशोर बाणखेले, संजय चिंचपुरे, संदिप निघोटशिवाजी राजगुरू, पंकज सरोदे, विकास निघोट, चंद्रकांत निघोट दत्ता राऊत, शोभा एरंडे, मनिषा कराळे, वर्षा दुरगुडे, सीमा लांडे, सुरेखा थोरात, शितल काळे, सुरेखा कडुसकर, सोनल पिंगळे , ऊमेश निघोट, जगदिश शेटे, पप्पु थोरात विलास पंधारे, गणेश थोरात इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे निवेदन निलेश पडवळ, अमित कातळे, विकास निघोट यांनी तर आभार संदिप गांजाळे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे