गुंजाळवाडी जरांगे पाटील यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सामूहिक प्रार्थना व हनुमान चालीसा पठण
1 min readगुंजाळवाडी दि.३१:- जरांगे पाटील यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मुक्ताईदेवी देवी मंदिर गुंजाळवाडी (ता.जुन्नर) येथे सामूहिक देवीला प्रार्थना व हनुमान मंदिर येथे सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले.तसेच एक मराठा लाख मराठा या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मुक्ताई मंदिर येथे गावातील सर्व महिला भगिनींनी मंगळवारी सकाळी बहुसंख्येने उपस्थित राहून देवीला साकडे घालून प्रार्थना केली. गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी चालू असल्याने शांतेत निषेध व्यक्त करण्यात आला.