एमआयटी कॉलेज पुणेचे विद्यार्थी करणार श्री क्षेत्र आणे गावचा चार दिवस अभ्यास; श्रमदानातून उभारणार वनराई बंधारे

1 min read

आणे दि.३०:- रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल आणि एमआयटी कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र आणे (ता.जुन्नर) येथे ग्रामीण तादात्म्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष विजय आहेर यांनी दिली.

श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली असून आणे ग्रामस्थ आणि रोटरीच्या वतीने विद्यार्थ्यांचे फेटे बांधून वाजतगाजत स्वागत करण्यात केले.

 एमआयटी कॉलेज पुणेचे कोऑर्डीनेटर डॉ.सत्यवान गागरे यांनी पुढील चार दिवसांमध्ये ग्रामीण तादात्म्य उपक्रमांतर्गत कॉलेज मधील १५० विद्यार्थी श्रमदानाच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, महिला सबलीकरण, शाळाभेट, वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत.

ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या खेड्याचा विकास कसा झाला याच्या अभ्यासासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रसंगी रोटरीचे संस्थापक महावीर पोखरणा, उपाध्यक्ष संभाजी हाडवळे सर, रोटेरियन पंकज चंगेडिया, रोहित नरवडे, तुषार आहेर उपस्थित होते.

देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर दाते, उपाध्यक्ष अनिल आहेर, विश्वस्त विनायक आहेर, ज्ञानेश्वर दाते आणे गावच्या सरपंच प्रियंका दाते व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते यांनी एमआयटीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे