साहित्यिक प्रा. सतिश शिंदे यांना सर्वोत्कृष्ट निवेदक साहित्यरत्न पुरस्कार
पुणे दि.२७– बोतार्डे ( ता. जुन्नर ) येथील ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रा. सतिश संतोष शिंदे यांना सर्वोत्कृष्ट निवेदक डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.हा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र राज्य रत्नागिरी भारत ( रजि ) व पुणे जिल्हा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील कलाप्रसाद सभागृहात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कविसंमेलनात देण्यात आला. यावेळी विजय वडवेराव, मनोज जाधव, जयद्रथ आखाडे, भावना खोब्रागडे, वैशाली लांडगे, सुभाष उगले, संतोष मोहिते, संजय मोरे, सतिश शिंदे, महेंद्र पाटील, बबन धुमाळ, प्रतिभा किर्तीकर्वे, सुनिल जाधव, दीपक जाधव, दादासाहेब सोनवणे, अशोक पवार यांच्यासह अनेक कवी व मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतिश शिंदे व उषा खोपडे यांनी केले.