“आई-वडिलांची समाजातील प्रतिष्ठा अबाधित ठेवा”- ए.पी.आय. महादेव शेलार

1 min read

निमगाव सावा दि.२५:- संस्कारहीन मुले गैरवर्तणूक, गुन्हेगारी करतात,चुकीचे वर्तन करून पुरुषार्थ गाजवतात, त्यामुळे अशा चुकीच्या कर्माचे वाईट फळ मिळते, आपल्या आई-वडिलांनी दिलेले संस्कार पाळा, त्यांची समाजातील प्रतिष्ठा जपा, आई-वडील सर्वश्रेष्ठ गुरु आहेत. असे मत नारायणगाव पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. महादेव शेलार यांनी श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे विद्यार्थी विकास मंडळ आयोजित अँटी रॅगिंग एक दिवशी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, ” आजची तरुण पिढी गुन्हेगारी, व्यसनाधीनता, रॅगिंग करणे, रोड रोमिओ याकडे आकर्षित होऊन यासारखे अनुचित वर्तन सर्रास घडत आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन आळा घालण्यास सक्षम आहे. कायदा आणि सुव्यवस्था, रॅगिंग, गुन्हेगारांना शिक्षा याबाबत माहिती देतानाच महाविद्यालय तरुण तरुणींनी चांगले मित्र जोडावेत, आई-वडिलांचे संस्कार पाळावेत, उच्च ध्येय ठेवावे, वाहतुकीचे नियम पाळावे मोबाईल सोशल मीडिया यांचा चांगला वापर करावा. आपल्यासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्री माता फुले, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श ठेवून, समाजात आपली वेळ वेगळी ओळख आणि अस्तित्व निर्माण करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया जाधव यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंग संदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमासाठी नारायणगाव पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. महादेव शेलार, गोपनीय विभागाचे ढेंबरे, निमगाव सावाचे पोलीस पाटील अनिल टांकसाळे, संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार, सचिव परेश घोडे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल पडवळ यांनी केले, तर प्रा. ज्योती गायकवाड यांनी प्रास्ताविक व प्रा सुभाष घोडे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे