वंचित बहुजन आघाडी डिघोळ ई यांच्या वतीने फळे वाटप कार्यक्रम संपन्न

1 min read

सोनपेठ दि.२५:- परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथे साडेतीन पीठापैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुका मातेचे प्रतीरूप रेणुका देवी मंदिर डिघोळ ई येथे शारदीय नवरात्रौत्सवा निमित्त वंचित बहुजन आघाडी शाखा डिघोळ ई च्या वतीने येणाऱ्या भाविक भक्तांना फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजीत केला.

महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात. त्यांनी सोय म्हणुन वंचित बहुजन आघाडी डिघोळ ई यांच्या वतीने आलेल्या भक्तांची सेवा म्हणुन फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजीत केला.

यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य वैभव खंदारे, तसेच अजयभैया गायकवाड, रुपकदादा गायकवाड, गोपिनाथ गायकवाड, पवन खंदारे. निलेश गायकवाड, सचिन कांबळे, ऋषी रोडे, विक्की गायकवाड,हरीशचंद्र गायकवाड, ज्ञानेश्र्वर जाधव, रोहन गायकवाड युवा नेते नागनाथदादा शिंगाडे व वंचित बहुजन आघाडी शाखा डिघोळ चे पदाधिकारी उपस्थीत होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे