पारगावात गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते गुणगौरव

1 min read

बेल्हे दि.२२:- पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथे इंदिरानगर नवरात्री उत्सव मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव व महात्मा गांधी विद्यालयामधील गुणवंत विद्यार्थ्यांना जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर दिल्ली युथ गेम्स अटलांटिक चॅम्पियन स्पर्धेत रनिंगमध्ये ब्रांझ पदक मिळवल्याबद्दल कार्तिकी सोमनाथ बो-हाडे हिचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक वर्षी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येतो.या कार्यक्रमासाठी ट्राॅफीचे सौजन्य ग्रामपंचायत सदस्य उत्तम फापाळे यांनी केले तर मंडळाच्या वतीने वही पेनचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा मंडळाचे उपाध्यक्ष रविकुटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पारगाव तर्फे आळे वि.का.सहकारी सोसायटी चे चेअरमन सचिन डुकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आमदार अतुल बेनके यांच्याकडे नवरात्री उत्सव कार्यक्रमासाठी सभामंडपाची मागणी केली. आमदारांनी मंडळ करत असलेल्या उपक्रमाची स्तुती करत विद्यार्थ्यांना अचानक भाषण करायला लावली व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भाषण केली.आमदार अतुल बेनके यांनी आपल्या भाषणात आमदार फंडातुन सभामंडपासाठी दहा लाख रूपयांचा निधी जाहीर केला. नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने भजन ,होम मिनिस्टर,वाघ्यांची गाणी,डांस स्पर्धा,होमहवन,महाप्रसाद आदि कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.सकाळ संध्याकाळ आरतीला उपस्थित राहणा-या भक्ताला लकी ड्रॉ काढून आकर्षक बक्षीस दिले जाते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने पारगावच्या सरपंच रेश्मा बोटकर, मंगरूळच्या सरपंच तारा लामखडे, चेअरमन बळीराम चव्हाण ,माजी सरपंच संपत डुकरे, माजी सरपंच लता चव्हाण, मुख्याध्यापक अनिल फापाळे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग डुकरे, अर्चना डुकरे, संतोष गाडगे ,विकास चव्हाण, रावसाहेब बो-हाडे ,तुषार येवले, संजय तटूटू, प्रशांत तट्टू, कैलास डुकरे व ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे