रानमळा येथील महिलांसाठी मोफत वणी यात्रा
1 min read
रानमळा दि.२२:- रानमळा (ता. जुन्नर) गावातील सर्व माता भगिनींसाठी नवरात्र उत्सवानिमित्त मोफत श्री क्षेत्र वनी दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे आठवे वर्ष असून सोमवार दि. 23 रोजी सकाळी ७ वाजता रानमळा गावातून यात्रेचे प्रस्थान होणार आहे. पप्पू गुंजाळ, सीए सावकार गुंजाळ, कैलास गुंजाळ यांनी या दर्शन वारीचे आयोजन केले असून सतीश गुंजाळ यांनी सर्व महिला भगीनींसाठी जेवणाची सोय केली आहे. तरी पप्पूशेठ गुंजाळ युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्व महिलांना या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.