नवरात्रोत्सवात शिंदेवाडीतील ४०० स्त्रीशक्तिला घडले सप्तश्रृंगीदेवीचे मोफत दर्शन

1 min read

आणे दि.२०:- शिंदेवाडी (ता.जुन्नर) शिंदेवाडीतील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून गावातील महिलांना नवरात्रोत्सवाचा योग साधून मोफत सप्तश्रृंगीदेवीच्या दर्शनाला नेण्याचा सामाजिक उपक्रम (दि.१७) रोजी यशस्वीपणे पार पडला.दुर्गेच्या अवताराने आठ हातांनी घरचा गाडा हाकणाऱ्या घरच्या दुर्गेला सांसारिक जबाबदारीतून उसंत मिळत नसल्याने स्त्रियांना शक्यतो देवदर्शनाला जाण्याचा योग तसा क्वचितच येतो. हीच बाब हेरून शिंदेवाडीचे माजी सरपंच एम. डी. पाटील शिंदे व शिंदेवाडी गावच्या उपसरपंच शीतल खंडू बेलकर यांनी गावातील स्त्रीशक्तीला शारदीय नवरात्रोत्सवात देवी दर्शनासाठी नेण्याचा संकल्प केल्यानंतर गावातील महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे मत जाणून घेऊन, महिलांच्या मागणीनुसार साडे तीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या वणीच्या सप्तश्रृंगीदेवीच्या दर्शनासाठी जाण्याचे नियोजन करण्यात आले होते.ह्या उपक्रमात ४०० महिलांनी व ग्रामस्थांनी सहभागी होऊन उदंड प्रतिसाद दिल्याने ७ बसचे नियोजन करावे लागले, नवरात्रोत्सवात सप्तश्रृंगीदेवीच्या दर्शनाचा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने अनेक महिलांनी समाधान व्यक्त केले, या उपक्रमाला गावातील अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.या सामाजिक उपक्रमाला वल्लभ शेळके यांनी गावात उपस्थित राहून सर्वाना शुभेच्छा दिल्या, यावेळी गावचे सरपंच अजित शिंदे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शिंदे,

जब्बार शेख, माजी उपसरपंच अविता निकम, अनिता औटी, ग्रा. सदस्या सुभद्रा शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदिप शिंदे, धोंडीभाऊ शिंदे, सा कार्यकर्ते गोरख भाऊ शिंदे,उपाध्यक्ष्य विलास मुळे, सुखदेव निकम, हनुमंत शिंदे किरण शिंदे, कुंडलिक शिंदे,काळुराम बेलकर. गीताराम बेलकर, मारुती आरोटे, भूषण कडुसकर तसेच सर्व आजी-माजी पदाधिकारी व सन्माननीय ग्रामस्थ उपस्थित होते.पुढील वर्षी ह्या सामाजिक उपक्रमाची व्याप्ती वाढवून, दरवर्षी नवीन ठिकाणी इतर इच्छुक असणाऱ्या ग्रामस्थांच्या सहकार्याने मोफत देवीदर्शन आयोजित करण्याचा मानस असल्याचे, माजी सरपंच एम. डी. पाटील शिंदे, उपसरपंच शितल खंडू बेलकर यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे