मॉडर्नच्या विद्यार्थांनी केले मुक्ताई मंदिर चकाचक; स्वच्छता हा देखील एक ‘उत्सव ‘ व्हावा:- विद्यार्थी

1 min read

बेल्हे दि.१८:- नवरात्र उत्सवानिमित्त मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बेल्हे (ता.जुन्नर) गावचे ग्रामदैवत मुक्ताई देवी मंदिर व परिसराची बुधवार (दि.१८) रोजी स्वच्छता केली. नवरात्र उत्सवानिमित्त परिसराची स्वच्छता हा उपक्रम घेण्यात आला. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेपासून जवळच असलेल्या ग्रामदैवत मुक्ताई मंदिर व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केली. मंदिराच्या पायऱ्या, फरशी पाण्याने धुऊन घासून पुसून चकाचक केली. तसेच परिसर झाडून कचरा गोळा केला. यामध्ये माध्यमिक विभागातील १०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. नवरात्र उत्सवांप्रमाणे ‘स्वच्छता’ हा देखील एक उत्सव व्हावा, स्वच्छता ही कायम करत राहण्याची प्रक्रिया आहे असे मत विद्यार्थांनी व्यक्त केले. तर विद्यार्थी दशेत मुलांना स्वच्छतेची सवय असणे आवश्यक आहे. हा उपक्रम राबवल्याने गावच्या व देवस्थान कमिटीच्या वतीने गावचे माजी सरपंच विश्वनाथ डावखर यांनी विद्यार्थांना खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे