मंगरुळमध्ये मराठा तरुणाच आमरण उपोषण

1 min read

मंगरुळ दि.१:- मंगरूळ (ता. जुन्नर) येथील प्रकाश पोपट लामखडे (रा.मंगरूळ) यांनी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू केले आहे. मंगळवार दि. ३१ सायंकाळी ५ वाजल्या पासून गावातील बाळासाहेब लामखडे चौक येथे हे उपोषण सुरू केले आहे. या तरुणाच्या उपोषणाला गावातील सर्वांनी पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असल्याने जुन्नर तालुक्यात सर्व गावांमधून जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यात येत आहे. तालुक्याच्या बऱ्याच गावांमध्ये नेत्यांना प्रवेश बंद आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे माझे आमरण उपोषण सुरूच असणार असल्याचं प्रकाश लामखडे यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे