सचिन वाळुंज जनमंगल व विविध कार्यकारी सहकारी संस्था संचालकपदी अपात्रच

1 min read

आळेफाटा दि.१ (वार्ताहर- मनीष गाडगे) आळेफाटा येथील सचिन दत्तात्रय वाळुंज हे यशवंत पतसंस्थेमध्ये अनेक कर्जदारांना जामीन राहिलेले असून सर्वच्या सर्व थकीत असून कर्जदार थकीत कर्जदारांवर कलम 101 व 156 नुसार वसुलीची कारवाई सुरु असल्याने संस्था उपविधीनुसार सचिन वाळुंज कसूरदार असल्याचे अनुमानित करून सहायक निबंधक सचिन सरसमकर यांनी तक्रारदार मनिष जालिंदर गडगे व कैलास मारुती सोनवणे यांच्या दाखल तक्रार अर्जाची दखल घेत. चेअरमन सचिन दत्तात्रय वाळुंज यांना पदमुक्त केल्याचा आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे सहकारी संस्था पुणे विभाग यांच्यामार्फत कायम ठेवण्यात आला.
सचिन दत्तात्रय वाळुंज यांना जुन्नरचे सहायक निबंधक सचिन सरसमकर यांनी 25 जुलै रोजी कलम 73 क अ नुसार सचिन वाळुंज यांची संस्था संचालक पदाची जागा बंद झाली असून त्यांचे संचालक पद रिक्त झालेले आहे. असा आदेश पारीत केलेला होता त्या आदेशाला आव्हान देत सचिन दत्तात्रय वाळुंज यांनी विभागीय उपनिबंधक योगीराज सुर्वे यांच्याकडे पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केलेला होता. मात्र पाच ते सहा हेअरिंग मध्ये सचिन वाळुंज हे कोणतेही सबळ पुरावे सादर न करू शकल्याने थकीत कर्जदारांचे जामीनदार असलेबाबतची गोष्ट अधोरेखित करत सचिन वाळुंज यांना कसूरदार ठरवत जुन्नर सहायक निबंधक यांचा 73 क अ नुसार सचिन दत्तात्रय वाळुंज यांची संचालक पदाची जागा रिक्त असलेबाबतचा आदेश कायम ठेवण्यात आला. दरम्यान राजकीय नाट्यमय घडामोडी बघावयास मिळाल्या. सचिन वाळुंज हे माजी आमदार शरद सोनवणे यांचे उजवा हात समजले जातं असून त्यांनी विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमध्ये प्रवेश केला. आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांना पतसंस्था व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा स्वतः सचिन दत्तात्रय वाळुंज यांच्या अध्यक्षतेखाली घेणेकामी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे विनंती वजा सूचना करीत. वार्षिक सर्वसाधारण सभादरम्यान स्टेथोस्को “जैसे थे” परिस्थिती असा रोजनामा मध्ये निकाल लिहिला. त्या गोष्टींचा फायदा घेत सचिन वाळुंज यांनी वडगाव आनंद विविध कार्यकारी सेवा सोसायटी व जनमंगल पतसंस्था या दोन्ही संस्थाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा उरकून घेतल्या. जेणेकरून लोकांसमोर मीच अद्याप संचालक पदावर रुजू आहे असा दिखावा केला. माझ्यावर कारवाई झालेली नसून माझ्याबाजूनेच निकाल झालेला आहे असे चित्र निर्माण केले.आपला मनोदय सिद्ध झाल्यानंतर त्यांनी पुन्हा माजी आमदार शरद सोनवणे यांच्या वाढदिवसाच्यादिवशी शिंदे गटात घरवापसी केली. शेवटी सहकारी संस्थाच्या नियमावली पुढे सचिन दत्तात्रय वाळुंज यांना पदउतार व्हावे लागले. सगळ्या संस्थामध्ये पदउतार झाल्यानंतर, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता सचिन दत्तात्रय वाळुंज ग्रामपंचायत वडगाव आनंदच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून ग्रामपंचायत सदस्यता पदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. येणाऱ्या 6 नोव्हेंबर ला सचिन वाळुंज यांच्या उमेदवारीबाबत मतमोजणीच्या दिवशी नक्की कौल कुणाच्या बाजूने जाणार याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे