आणे गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष किशोर आहेर तर उपाध्यक्षपदी अशोक दाते यांची बिनविरोध निवड
1 min readआणे दि.३१:- श्री रंगदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणे (ता.जुन्नर) गावात महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी ग्रामस्थांच्या सहकार्याने बिनविरोध निवड करण्यात आली तंटामुक्ती अध्यक्ष पदी किशोर आहेर तसेच उपाध्यक्षपदी अशोक दाते यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये सरपंच प्रियंका दाते, उपसरपंच सुहास आहेर आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच रंगदास स्वामी देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते,
रंगदास स्वामी विवाह मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाते, मातोश्री संकुलाचे सचिव किरण आहेर, माजी सरपंच जयराम देशमुख, माजी सरपंच योगेश आहेर, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, अजित आहेर,
संतोष आहेर, डॉक्टर दीपक आहेर, वैभव आहेर, महेश आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावच्या सरपंच प्रियंका दाते यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड केल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले. नवनियुक्त तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या.