मंगरूळ गावात पुढाऱ्यांना ‘नो एन्ट्री’; चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष:- ग्रामस्थ

मंगरूळ दि.२७ : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील मंगरूळ व झापवाडी गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंद केला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही अथवा तसा निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीने गावात येऊ नये, तसे झाले तर त्यानंतर होणाऱ्या घटनेला प्रशासन जबाबदार राहील. सकल मराठा समाज मंगरूळ व समस्त ग्रामस्थ मंगरूळ च्या वतीने मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्व राजकीय पक्ष व नेत्यांवर जाहीर बहिष्कार व त्यासाठी शुक्रवार दि.२७ रोजी सकाळी गावात जाहिर सभा व रॅली आयोजित केली होती.

“चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष, मराठा आरक्षण जो पर्यंत मिळत नाही, तो पर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्यास गावात प्रवेश नाही”अशा मजकुराचे बॅनर गावात लावले आहेत.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेत्यांना गावात प्रवेश नाकारणारे मंगरुळ हे जुन्नर तालुक्यातील पहिलेच गाव ठरले असल्याचं ग्रामस्थांनी सांगितले. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे.

या वेळी गावच्या लोकनियुक्त सरपंच तारा दत्तात्रय लामखडे, उपसरपंच नानाभाऊ सावकार नवले तंटामुक्त समिती अध्यक्ष संपत लामखडे,मा. उपसरपंच दता लामखडे, विनायक लामखडे, नारायण खुटाळ, विक्रम लामखडे, गोरख लामखडे, शिवाजी खिलारी, रामदास खिलारी, ज्ञानेश्वर पवार, अमोल कसाळ, गोरख कोरडे, कैलास लामखडे, सचिन भोजणे यांसह शेकडो ग्रामस्थ उपस्थिती होते.

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना मंगरूळ गावातील मराठा समाजाकडून पाठिंबा दिला आहे.आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात एकाही नेत्याला प्रवेश नाही.असा निर्णय घेणार मंगरूळ जुन्नर तालुक्यातील पाहिलं गावं आहे.”

दत्ता लामखडे, माजी सरपंच, मंगरूळ

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे