गहाळ झालेले ऊस तोड कामगारांचे मोबाईल परत करण्यास ओतूर पोलिसांना यश

1 min read

ओतूर दि.२२:- ओतूर (ता. जुन्नर ) पोलीस स्टेशन हद्दीतील बनकरफाटा ते भोईरवाडी रोडने विठ्ठल सूर्यभान बोंबले (रा. भोईरवाडी ता. जुन्नर जि. पुणे) हे जात असताना त्यांचा व त्यांच्या साथीदार यांचा मोबाईल फोन गहाळ झाल्या बाबत त्यांनी ओतूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्या नंतर ओतूर पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या माहिती प्राप्त करून. गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करून विठ्ठल बोंबले यांना खात्री करून परत केल्या बद्दल बोंबले यांनी ओतूर पोलिसांचे आभार मानले आहे. आत्ता पर्यंत ३७ ते ४० मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केलेल्या दमदार कारवाई मुळे ओतूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस हवालदार महेश पटारे, देविदास खेडकर, सायबर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण सुनील कोळी यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे