ओतूर येथील उपबाजारात कांद्यास उच्चांकी बाजारभाव 

1 min read

ओतूर दि.२६:- आळेफाटा (ता.जुन्नर) येथील उपबाजारात गुरुवार दि.२६ रोजी कांद्याच्या २६४२१ कांदा पिशवी ची आवक झाली असुन एक नंबर कांद्यास दहा किलोला ६११ रूपये उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुय्यम बाजारात ओतूर या ठिकाणी झालेल्या नीलावात ५/६ प्लॉट ला ६०० ते ६११ रुपये भाव मिळाला, एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोस ५५० ते ६०० रूपये बाजार भाव मिळाला तसेच सुपर गोळे कांद्यास ४८० ते ५५० बाजारभाव मिळाला‌‌.

तर गोल्टी/ गोल्टा:-३३० ते ४००, बदला कांदा :- २०० ते ४०० बाजारभाव मिळाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे