वडगाव आनंद ग्रामपंचायत सरपंचपद बिनविरोध; सदस्य सात जागेसाठी दुरंगी आणि तिरंगी लढत
1 min readआळेफाटा दि.२५ (वार्ताहर:- मनीष गडगे):- जुन्नर तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी महत्वाच महसूली गाव असणारी आळेफाटा व्याप्तीप्राप्त असणारी वडगाव आनंद ग्रामपंचायतचे निवडणूकचे बिगुल वाजले असून दि २५ ऑक्टोबर रोजी माघारीनामा सिद्ध झाल्यानंतर आठ ठिकाणचे उमेदवार बिनविरोध झालेले असून सरपंचपद रेलिका अरुण जाधव यांना बिनविरोध प्राप्त झाले.
उर्वरित सात जागा यासाठी दुरंगी आणि तिरंगी लढत होणार आहे. वडगाव आनंद ग्रामपंचायत फायनल उमेदवार यादी पुढीलप्रमाणे वार्ड क्र 1 या गटात तिरंगी लढत होणार असून ना म प्र महिला गटात दिपाली मनिष गडगे, शीतल गणेश भुजबळ, वदंना अरविंद शिंदे यांत लढत होणार आहे. वार्ड क्र 1 गटात अ जा स्त्री गटात अर्चना नितीन काशिकेदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वार्ड क्र 1 मध्ये सर्वसाधारण लढत चुरशीची होणार असून या लढतीकडे सर्व तालुक्याचे विशेष लक्ष असेल. सर्वसाधारण पुरुष गटात गणेश मच्छिन्द्र भुजबळ विरुद्ध सचिन दत्तात्रय वाळुंज अशी प्रतिष्ठा पणाला लावून लढत होणार आहे.
गेल्या महिन्यात माजी आमदार शरद सोनवणे गटाचे सचिन वाळुंज यांनी विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे निकटवर्तीय गणेश भुजबळ यांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केला, मात्र पंधरा दिवसांतच काही तांत्रिक कारणास्तव त्यांनी पुन्हा शरद सोनवणे गटात घरवापसी केली. त्यामुळे माजी आमदार विरुद्ध विद्यमान आमदार यांच्यामध्ये राजकीय अस्मिता टिकवण्यासाठी आपापले निकटवर्तीय सहकारी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
वार्ड क्र 2 मध्ये सर्वसाधारण पुरुष गटात प्रताप रामभाऊ शिंदे, प्रफुल्ल भाऊसाहेब इथापे, कैलास बाबुराव वाळुंज अशी लक्षवेधी तिरंगी लढत होणार असून प्रताप शिंदे व कैलास वाळुंज यांना माजी ग्रामपंचायत सदस्यपदाचा अनुभव असून तरुण गटाची प्रथम पसंती प्रफुल इथापे यांना आहे.
या गटात ही अटीतटीची लढत बघावयास मिळणार आहे. सर्वसाधारण स्त्री गटात माजी ग्रामपंचायत सदस्य वैशाली संजय देवकर यांना पुनःश्च ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध नियुक्ती करण्यात आलेली आहे.
अ जा स्त्री गटात वडगाव आनंद ग्रामपंचायत कार्यक्षेत्र यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व उल्हास देवकर यांच्या सुनबाई अल्पना सचिन देवकर यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. वार्ड क्र 3 गटात सर्व जागा बिनविरोध झाल्या असून त्यात संदिप सुखदेव गडगे, संतोष रेवबा पादीर, कल्पना संपत पादीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वार्ड क्र 4 मध्ये ना म प्र पुरुष गटात ऋषिकेश पांडुरंग गडगे, सर्वसाधारण महिला गटात निशा नवनाथ वाळुंज यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. वार्ड क्र 3 मध्ये 1 जागेसाठी सर्वसाधारण पुरुष गटात दुरंगी लढत होत असून संतोष बबुशा साबळे व गोरक्षनाथ तानाजी देवकर उमेदवार आपापले नशीब आजमावत आहे.
वडगाव आनंद सगळ्यात महत्वाचा समजला जाणारा वार्ड क्र 5 मध्ये तीन वेगवेगळ्या जागा यासाठी तुल्यबळ लढत होणार आहे. सर्वसाधारण पुरुष गटात सोमनाथ गोविंद गडगे व नितीन रघुनाथ चौगुले या दोघांमध्ये लढत होणार आहे. ना म प्र महिला गटात विघ्नहर सहकारी साखर कारखाना माजी व्हाईस चेअरमन कै भिमाजी कमळू गडगे यांच्या सुनबाई व गोमाता पतसंस्था चेअरमन सुरेश गडगे यांच्या सौभाग्यवती अमृता सुरेश गडगे व शोभा संतोष शिंदे यांच्यात लढत होणार आहे.
यामध्ये राजकीय पारंपरिक वारसा लाभलेले अमृता गडगे यांचे पारडे जड समजले जाते. सर्वसाधारण स्त्री गटात अश्विनी राम चौगुले व रंजना बबन गुंजाळ यांच्यात लढत होणार आहे. सर्व लढत देणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य 5 नोव्हेंबर रोजी मतदारांमार्फत मतपेटीमध्ये बंद होणार असून निकाल सहा नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. उमेदवार यांनी आपापले मतदार यांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लतृपत्या राबविण्यात येणार असून निश्चितच मतदार हाच राजा असून तो जो ठरवेल त्याच ग्रामपंचायत उमेदवाराची सदस्यपदी वर्णी लागेल.