उपमुख्यमंत्री अजित पवारांसमाेरच पंतप्रधान नरेंद्र माेदींची शरद पवारांवर टीका; शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?
1 min readनगर दि.२७:- शरद पवार कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना एमएसपीचे पैसे मिळत नव्हते. पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं. वैयक्तिकरित्या त्यांचा सन्मान मात्र शेतकऱ्यांना काय दिलं, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर नाव न घेता टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांसमाेर शरद पवारांवर माेदी यांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारने नमाे सन्मान याेजना सुरू करून शेतकऱ्यांना माेठा दिलासा दिला आहे. आता शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी काल शिर्डी दाैऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डाॅ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित हाेते. नरेंद्र माेदी म्हणाले, ”राज्यात १ काेटी १० लाख आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्याच आले आहे. आयुष्यमान भारतच्या माध्यमातून ७० हजार काेटी खर्च झाले आहे. निळवंडेचा प्रश्न ५ दशकांपासून प्रलंबित हाेता. ताे आमच्या सरकारने सुरू केला आहे. २०१४ आधी केवळ भ्रष्टाचाराची चर्चा हाेती. आता केवळ विकासाची चर्चा हाेत आहे.”