बेल्हे सरपंचपदासाठी २६ अर्ज आल्याची माहिती; २० तारखेला हाच आकडा ११ झाल्याचे प्रसिद्ध; दोन दिवसांनंतरही उमेदवारी माघारीची माहिती नाहीच; कारभारावर प्रश्नचिन्ह

1 min read

जुन्नर, दि.२८:- जुन्नर तालुक्यातील मुदत संपलेल्या २६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. याबाबतचे अर्ज माघारी घेण्याची मुदत बुधवारी (दि. २५) होती.

त्यानुसार अनेक उमेदवारांची माघारी झाली, काही ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली; मात्र निवडणूक शाखेने याबाबतची एकत्रित माहिती प्रसिद्ध न केल्यामुळे कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान बेल्हे या गावांतून सरपंचपदासाठी २६ अर्ज आल्याचे १९ तारखेच्या यादीत प्रसिद्ध केले होते. २० तारखेला हाच आकडा ११ झाल्याचे निवडणूक शाखेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले होते. दरम्यान रात्री उशिरा तहसिलदार रविंद्र सबनीस यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी माघारीच्या अंतिम याद्या दुपारीच तयार झाल्याचे सांगितले.

याबाबत तहसील कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांसह निवडणूक शाखेचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली मात्र काही अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे एकत्रित माहिती होऊ शकली नाही, अधिकारी ट्रेनिंगला गेले आहेत, आदी कारणे देण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे